फैजपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत चहा विक्री सुरू ठेवल्यानंतर शहरातील चहा विक्रेता अजहर अली सादीक अली (21, रा.इस्लामपुरा, फैजपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी यांचे अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना बंद असण्याबाबत आदेश असतांनाही चहा टपरी उघडी ठेवल्याने अजहर अली यांच्याविरुद्ध भादंवि 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फैजपूर पोलिस करीत आहेत.