फैजपूरात डॉक्टराना मागितली 25 लाखांची खंडणी : तिघांविरुद्ध गुन्हा

0

फैजपूर : शेत जमिनीचा ताबा सोडा अन्यथा त्या ठिकाणी पक्षाचे बॅनर लावू व आपणास मारून टाकू, अशी धमकी देत 25 लाखांची खंडणी व प्रतिमहिना एक लाख रुपयांची मागणी येथील आशीर्वाद एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेंद्र प्रभाकर खाचणे यांना केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शनिवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. श्याम पुनाजी इंगळे (शिव कॉलनी, फैजपूर), शांताराम मांगो तायडे (हिंगोणा), शेख युनूस शेख अयुब उर्फ गबल्या अशी आरोपींची नावे आहेत. . डॉ.शैलेंद्र खाचणे यांनी भुसावळ रोड वरील शेत गट क्रमांक 945 ही जमीन खरेदी केली आहे याबाबत आरोपींनी डॉक्टरांच्या रुग्णालयात तसेच शेतात 12 जुलै 18 ते 5 ऑगस्ट 18 दरम्यान प्रवेश करून तुम्ही, शेत गट क्रमांक 945 हे रवींद्र जावळे यांनी घेतली आहे त्या जमिनीचा ताबा सोडा अन्यथा त्या जागेवर आम्ही पक्षाचे बॅनर अशी धमकी देत प्रकरण मिटवायचे असल्यास 25 लाख रुपये रोख व दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली व शेतात विनापरवाना पक्षाचे बॅनर लावले यावेळी साक्षीदार समजवण्यात गेले असता त्यांना निघून जा नाहीतर तुम्हाला तलवारीने कापून टाकू अशी धमकी दिली व आमच्या विरुद्ध तक्रार केल्यास चारशे-पाचशे कार्यकर्ते आणून दवाखान्याची तोडफोड करून तसेच तुमच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिट चा खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याने डॉक्टर शैलेंद्र खाचणे यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून शाम इंगळे, शांताराम तायडे, शेख युनुस ,यांच्याविरुद्ध भादवि कलम 384 ,387 ,447 ,448, 504 ,506, 34 व आर्म एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास एपीआय दत्तात्रय निकम पीएसआय रामलाल साठे करीत आहे.