फैजपूरात तलवार हल्ल्यात एक जण जखमी ; आरोपीला अटक

0

फैजपूर- शहरात रविवारी सायंकाळी एकावर तलवार हल्ला झाला मात्र सुदैवाने तलवार फक्त बोटाला लागल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सावदा रोडवरील आफताब ऑटो पार्टस् या दुकानाजवळ घडली. शेख इजाज अहमद शेख जाकीर उर्फ गुड्डू (वय 24) याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी हल्लेखोर शाहरुख कलीम शेख यास अटक करण्यात आली असून मुज्जमिल कयुम्म मलिक पसार झाला आहे. गत आठवड्यात पोलिसांनी दक्षिण बाहेर पेठ येथून एका घरातून तलवारी जप्त केल्या होत्या. शहरात तलवारींचा शस्त्रसाठा असण्याची शक्यता असून पोलिसांनी धडक कारवाई करण्याची अपेक्षा सुज्ञ नागरीकांकडून व्यक्त होत आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.