फैजपूरात नागरी सुविधांना ‘खो’ ; रणराणिगींचे पालिकेसमोर उपोषण

0

फैजपूर : नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास फैजपूर नगरपालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा असंतोष व्यक्त करत येथील महिलांनी विविध मागण्यांसाठी फैजपूर नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

शहरातील श्रीकृष्णनगर व रेणुका कॉलनी मधील रींगरोडवरील गटार अपूर्णावस्थेत असल्याने या गटारीतील घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने ते दुर्गंधी युक्त पाणी रस्त्याच्या कडेला येऊन नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याबाबत फैजपूर नगर पालिकेला वेळोवेळी लेखी तक्रार देऊनही नगरपालिका प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याने पालिकेसमोरच सोमवारपासून उपोषण आंदोलनास सुरुवात करण्यात आली.