फैजपूरात राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपाची निदर्शने

0

फैजपूर : :कोरोना महामारीच्या काळात प्रभावी उपाय योजना करण्यात प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षमपणे राबविण्यास आणि सर्व सामान्य जनतेला पुरेशी मदत पोहोचविण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याने जनतेच्या वतीने निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यातर्फे राज्य सरकारचा निषेधार्थ पूर्व घोषित महाराष्ट्र बचाव आंदोलन द्वारा शुक्रवारी शहरातील श्रीराम मंदिराजवळ फैजपूर भाजपातर्फे निषेधार्थ सोशल डिस्टनचे पालन करीत काळे मास्कर व काळे कपडे परीधान करून निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
संकटकाळात देखील या सरकारच्या अपयशांचा पाढा वाचावा तेवढाच कमी आहे. जनतेचा आवाज बनून ह्या सरकारच्या मुस्कटदाबीविरुद्ध आवाज उठवण्यात आला. यावेळी निदर्शनकर्त्यात शहराध्यक्ष अनंता नेहेते, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, सरचिटणीस संजय सराफ, युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक होले, अनिरुद्धभाऊ सरोदे, जितेंद्र भावसार, दिव्यांग सेनेचे योगेश चौधरी, श्याम भंगाळे आदी उपस्थित होते.