फैजपूर : फैजपूर शहरात एक सलून व्यावसायिकासह तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी प्रशानाला प्राप्त झाल्याने शहरात खळबळ डडाली आहे. शहरातील बाधितांची संख्या 25 वर पोहोचली आहे. शहरातील दक्षिण बाहेरपेठ भागात गेल्या चार दिवसांपूर्वी पॉझीटीव्ह आढळलेल्या रुग्णाच्या परीवारातील दोन सदस्यांच्या समावेश आहे तर त्याच भागातील एक सलून व्यावसायीकालादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, फैजपुरातील कोरोनाबाधीतांची संख्या 25 झाली असली तरी त्यापैकी आठ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर दोन रुग्ण मयत झाले असून 15 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.