आमदार हरीभाऊ जावळेंची संकल्पना : महाराष्ट्रात प्रथमच राजकारणविरहित कृषी शिबिर
फैजपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे म्हणून येत्या 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रथमच यावल-रावेर तालुक्यातील शेतकर्यांसाठी फैजपूर शहरातील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात अटल महाकृषी महाबिबिराचे आयोजन आमदार हरीभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून होणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील डिगंबशेठ नारखेडे सभागृहात सर्व कृषी व महसूल अधिकार्यांची बैठक झाली. पसंगी आमदार जावळे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी कृषी मंत्री एकनाथराव खडसे व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
1 ऑक्टोबर रोजी महाकृषि महाशिबिर
आमदार जावळे म्हणाले की, दरवर्षी यावल-रावेर तालुक्यातील नागरीकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरीकांच्या हिताचे कार्यक्रम यावल-रावेर तालुक्यात राबवले जातात. त्या अनुषंगाने येत्या 1 ऑक्टोबर रोजी अटल महाकृषी महाशिबिराचे आयोजन शेतकर्यांसाठी राबवणार आहे. यात प्रामुख्याने शेतकरी संवाद, शेतीवरील अर्थशास्त्र व कृषी प्रदर्शन हे तीन प्रमुख मुद्दे या शिबिरात असतील. शेतकर्यांच्या भविष्यासाठी हे शिबिर लाभदायक ठरणार आहे. यात केवळ दोन हजार शेतकर्यांचा सहभाग घेतला जाणार आहे यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. प्रथम नोंदणी करणार्या शेतकर्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी जेटी.महाजन तंत्र निकेतन अध्यक्ष शरद महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, हिरालाल चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक ठाकूर, कृषी संचालक अनिल भोकरे, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबाले, तहसीलदार कुंदन हिरे, केळी तज्ञ डॉ.के.बी.पाटील, मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयाचे सुदाम पाटील, प्राचार्य डॉ.नंदिनी चौधरी यांच्यासह कृषी, महसूल, वन विभागातील अधिकारी व यावल रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.