फैजपूर पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत 57 विषयांना मंजुरी

0

शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॉमेरे होणार दुरुस्त ; घनकचरा प्रकल्पाला पुन्हा मिळणार चालना

फैजपूर- फैजपूर नगरपरीषद सर्वसाधारण बैठकीत गावातील मूलभूत सुविधेला प्राध्यान्य देत यासह सभेच्या नोटीसीवरील 57 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपरिषदेची सर्वसाधारण बैठक नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिका सभागृहात सकाळी 11 वाजता झाली. या सभेला मुख्याधिकारी किशोर चव्हाण, उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, विरोधी पक्ष नेते शेख कुर्बान यासह नगरसेवक व नागरसेविका उपस्थित होते.

विविध कामांना मिळाली मंजुरी
या बैठकीत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई नुसार राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती तथा हजेरी ही बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करावी यासाठी शासन निर्णय घेण्यात आला असून नगरपरीरषद संचलित म्युनिसिपल हायस्कुलमधील 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी यासाठी मशीन खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे तसेच दलित वस्ती निधी योजनेंतर्गत प्रभाग सातमधील म्युनिसिपल हायस्कूल व जिल्हा परीषद शाळेमधील बाहेरच्या जागेवर रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, धाडी नदीतील पुरुषांचे व महिलांचे शैचालय पडणार, शहरातील धाडी नदीला लागून श्रीराम टॉकीजपासून ते लक्कड पेठ पर्यंत नगरपरीषदेने वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत बायपास रोडचे काम हाती घेतलेले असल्याने रस्त्यात येणारे सार्वजनिक शौचालय, श्रीराम टॉकीज जवळील पुरुष व महिलांचे दोन शौचालय पाडण्यात येणार आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने शहर दरवाजा लक्कड पेठ जवळ पुरूष व महिलांसाठी शौचालय बांधण्यात येणार आहे.

शहरातील सीसीटीव्ही होणार दुरुस्त
फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना शहरातील मुख्य भागातील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावे याबाबत पत्र दिले होते तर शहरातील जे सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त होतील ते दुरुस्त केले जातील अन्यथा नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील, असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले. म्युनिसिपल हायस्कुलमध्ये आणि 1936 च्या ग्रामीण अधिवेशन संकल्प चित्र येथे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे

शहरात 16 ठिकणी काँक्रिटीकरण
शहरातील काही नवीन वस्तीमध्ये तर काही ठिकाणी खराब झालेले रस्ते या ठिकाणी पालिकेने रस्ते बनविण्याचा विचार केला असून शहरात एकूण 16 ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे तर धार्मिक स्थळ आहे अशा तीन ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. एकंदरीत पाहता या बैठकीत गावाचा विकास कसा साधला जाईल यावर जास्त पालिकेने भर दिलेला आहे. यावेळी कनिष्ठ अभियंता एस.व्ही.शेख, रोखपाल संजय बाणाईते, पाणीपुरवठा अभियंता विपूल साळुंखे, दिलीप वाघमारे, संतोष वाणी व सुधीर चौधरी उपस्थित होते.