फैजपूर पोलिस उपअधीक्षकांचा पोलिस महासंचालकांच्या पदकाने सन्मान

फैजपूर : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल व उल्लेखनीय सेवेबद्दल तसेच गडचिरोली येथे कार्यरत असलेला फैजपूरचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलिस महासंचालक डॉ.रजनीश शेठ यांनी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर केले होते. जळगाव येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सन्मानचिन्ह लावून डॉ.सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. पोलिस कवायत मैदानावर झालेल्या कार्यक्रमास जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचाही गौरव
पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणार्‍या आणि विशेष कार्य केलेल्या जिल्ह्यातील सात हवालदार व चार नाईक यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यात जळगाव मुख्यालयातील संतोष सुरवाडे, जळगाव वाहतूक शाखेच्या महिला हवालदार मेघना जोशी, महामार्ग सुरक्षा पथकाचे शांताराम काळे, जळगाव एटीसीचे रवींद्र भगवान पाटील, भुसावळ बाजारपेठचे नंदकिशोर सोनवणे, भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील संदीप चव्हाण, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे हेमंत शिरसाठ, जळगाव मुख्यालयाचे रवींद्र वंजारी, जळगाव एटीसीचे प्रवीण पाटील यांना पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.