रावेर- फैजपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांची बदली झाल्यानंतर सोमवारी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. पिंगळे यांनी यापूर्वी नाशिक, रावेर, धुळे येथे पोलिस निरीक्षक म्हणून आपली सेवा बजावली आहे. रावेर येथे असताना त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावली होती तर कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवला होता तर रावेर येथे असताना नरेंद्र पिंगळे यांचे डीवायएसपी म्हणून प्रमोशन होऊन त्यांची धुळे येथे बदली झाली होती तर आता धुळे येथून त्यांची पुन्हा फैजपूर पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.