फैजपूर विकासोत शेतकरी पॅनलचे वर्चस्व

फैजपूर : विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 13 जागांसाठी नुकतीच झाली. त्यात चार बिनविरोध निवडून आल्यानंतर नऊ जागांसाठी 12 उमेदवार रींगणात होते. त्यापैकी शेतकरी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले.

या उमेदवारांनी मिळवला विजय
चंद्रशेखर देविदास चौधरी (200), पांडुरंग दगडू सराफ (186), केतन डिगंबर किरंगे (189), अप्पा भालचंद्र चौधरी (180), हेमराज खुशाल चौधरी (163), काशीनाथ डोंगर वारके (168), नरेंद्र पितांबर चौधरी (158) हे शेतकररी पॅनलचे सदस्य विजयी झाले तर अपक्ष नितीन नेमाडे (193) व अनुसूचित जाती-जमातीत संतोष मेढे (130) विजयी झाले. दरम्यान, ओबीसी गटातून विलास महारु महाजन व महिला गटातून शकुंतला मोतीराम भारंबे, अनिता अरुण चौधरी, भटक्या विमुक्त जाती गटातून माधव भोई बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी एम.बी.गाढे यांनी होते. योगेश सूर्यवंशी, दामू पाटील, मनोज कुलकर्णी यांनी सहकार्य केले.