फैजपूर : शहरातील शिवकॉलनी परीसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
फैजपूर शहरातील शिवकॉलनी परीरसरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 12 जून रोजी रात्री 11.30 वाजता पीडीत मुलगी आपल्या कुटुंबियांसह जेवण करून झोपल्यानंतर अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार सोमवार, 13 जून रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या भावाने बुधवार, 15 जून रोजी दुपारी तीन वाजता फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अनिल पाटील करीत आहे.