फैजपूर शहरात रामनवमीला घरोघरी लावले दिवे

0

कोरोनापासून वाचण्याची शक्ती मिळावी प्रभू श्रीरामचंद्रांना घातले साकडे

फैजपूर : भारताला या महामारीपासून लढण्याची, वाचण्याची आणि वाचवण्याची शक्ती प्रभू श्रीरामाकडे रामनवमीला संध्याकाळी घरासमोर 9 दिवे लावून साकडे टाकून मागण्यात आली. फैजपूर शहरात रामनवमी निमित्त गुरुवारी सायंकाळी सात वाजता घराबाहेर, कंपाउंडमध्ये, घरोघरी वॉलवर नऊ तेलाचे दिवे लावण्यात आले. त्यामध्ये कापूरची पावडर करून टाकण्यात आली. यामुळे वातावरण शुद्ध नि पवित्र होईल. कोरोनाच्या महाभयंकर संकटात अडकलेल्या आपल्या भारताला सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी, आपल्या सर्वांना वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छतादूत आणि पोलीस यंत्रणा या सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी चला प्रभू श्रीरामांना साकडे घालण्यात आले.