फैजपूर शहर कोरोनामुक्त : ‘त्या’ दोघा पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह
फैजपूर : शहरात दोन कोरोना रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सोमवारी त्या दोघा रुग्णांचा रीपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याने फैजपूर शहर हे कोरोनामुक्त झाले आहे.
माय-लेकींची कोरोनावर मात
शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील रहिवासी हे कामानिमित्त अहमदाबाद येथे गेले होते मात्र लॉकडाऊन झाल्यानंत तेथेच अडकून होते. दिड महिन्यानंतर ते शहरात दाखल झाले व त्यांच्यात कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने आई व मुलीला कॉरंटाईन करण्यात आले होते तर दोन दिवसांनी पॉझीटीव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दक्षिण बाहेर पेठ व सिंधी कॉलनी लागलीच सील करण्यात आला मात्र सोमवारी दोघा माय-लेकींनी कोरोनावर मात केली असून घरी सुखरूप पोहोचले आहेत. शहर कोरोना मुक्त झाले असले तरी नागरीकांना खबरदारी घ्यावीच लागणार असून प्रशासनाने नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.