मुंबई । नंदादीप कीर आणि तुषार कमानी यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर फ्युचर्स स्टार्स फुटबॉल क्लबने इलेव्हन स्टार्स फुटबॉल क्लबचा 4-0 असा धुव्वा उडवला. या विजयामुळे फ्युचर्स स्टार्स फुटबॉल संघाच्या खात्यात तीन गुण जमा झाले. नंदादीप आणि तुषारने प्रत्येकी दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबई शहर फुटबॉल संघटना आयोजित थर्ड डिव्हीजन लढतींमध्ये खार वेस्ट फुटबॉल असोसिएशन संघाने चेंबुराईटीज स्पोर्ट्स क्लबचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात किरण मकवाना आणि जय तांबे यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला विजयी केले.
अॅथलेटिक क्लब आणि मुंबई वॉरियर्स ब या संघातील सामन्यात निल बाप्टीस्टाचा गोल निर्णायक ठरला. निलच्या गोलाच्या जोरावर अॅथलेटिक क्लबने हा सामना 1-0 असा विजय मिळवला. सिर्फ केवल फुटबॉल क्लबच्या विजयात रोशन नर्होना आणि अजय कदम चमकले. या दोघांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला ब्लॅक पॅथर्स संघाचा 2-0 असा पराभव केला.