फ्लॉवर, तोंडली, कोबी, वांगी, शिमला मिरची महागली

0

पुणे । श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील गुलटेकडी येथील तरकारी विभागात रविवारी फळभाज्यांची आवक घटली. त्यामुळे फ्लॉवर, कोबी, वांगी, तोंडले, शिमला मिरची, कांदा, दुधी भोपळ्याचे भाव वाढले. इतर मात्र फळभाज्यांचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

गेल्या आठवड्यात 170 ते 180 ट्रक इतकी भाज्यांची आवक होती. रविवारी बाजारात 160 ते 170 ट्रक इतकी भाज्यांची आवक झाली. कर्नाटकातून मटार 2 टेम्पो, कर्नाटकातून कोबीची 4 ते 5 टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून शेवगा 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरातमधून हिरवी मिरची 14 ते 15 टेम्पो तर स्थानिक भागातून सातारी आले 1500 ते 1600 गोणी, टोमॅटो चार ते साडेचार हजार पेटी, फ्लॉवर 18 ते 20 टेम्पो, कोबीची 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, लाल भोपळा 10 ते 12 तर भुईमुगाची 200 पोती इतकी आवक झाली. याशिवाय कांद्याची 125 ट्रक, आग्रा, इंदौर आणि गुजरातमधून बटाट्याची 60 ट्रक, गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसणाची साडेपाच ते 6 हजार गोण्यांची आवक झाली आहे.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कोबी : 80-140, वांगी : 200-400, डिंगरी : 150-200, नवलकोल : 100-150, ढोबळी मिरची : 300-350, तोंडली : कळी 300-350, जाड : 100-120, शेवगा : 450, गाजर : 140-160, वालवर : 250-300, बीट : 120-160, घेवडा : 300-350, कोहळा : 100-150, आर्वी : 200-300, घोसावळे : 150-200, ढेमसे : 200-220, मटार : परराज्य : 500-550, स्थानिक : 500-600, पावटा : 300-400, भुईमूग शेंग – 250-350, तांबडा भोपळा : 60-120, सुरण : 280-300, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600, कांदा : 200-250, बटाटा : 60-250, लसूण : 200-450, आले सातारी : 150-200, भेंडी : 250-350, गवार : गावरान व सुरती 300-500, टोमॅटो : 400-500, दोडका : 250-350, हिरवी मिरची : 300-500, दुधी भोपळा : 100-200, चवळी :200-250, काकडी : 100-150, कारली : हिरवी 300-350, पांढरी : 200-250, पापडी : 200-250, पडवळ : 250-300, फ्लॉवर : 100-150.

पालेभाज्यांच्या दरात घट
मार्केटयार्डातील तरकारी विभागात कोथींबिरीची तब्बल 2 लाख जुडी तर मेथीची 1 लाख जुड्यांची आवक झाली आहे. जिल्ह्यात तसेच आसपासच्या भागात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे मार्केटयार्डात पालेभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे दरामध्ये काही प्रमाणात घट झाली .

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव 
करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 400-500, मुळे : 800-1200, राजगिरा : 400-500, चुका : 400-500, चवळई : 500-800, पालक : 400-500, कोथिंबीर : 300-600, मेथी : 300-400, शेपू : 300-500, कांदापात : 800-1200, चाकवत : 400-500.

कलिंगड, खरबुज, डाळींब महागले
रविवारी मार्केटयार्डातील फळबाजारात कलिंगड, खरबूज आणि पपईची आवक घटल्याने दरात 2 ते 5 रुपयांची तर डाळींब, पेरु आणि चिक्कूच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. फळबाजारात केरळहून अननसाचे सात ट्रक, मोसंबी 35 ते 40 टन, संत्रा 2 टन, डाळिंब 80 ते 100 टन, पपई 15 ते 20 टेम्पोे, चिक्कू 600 गोणी, प्लम, नास्पती आणि पिअर दीड ते 2 हजार पेटी, पेरुची 500 क्रेट इतकी आवक झाली. याशिवाय कलिंगड 10 ते 15 टेम्पो, खरबुज 4 ते 5 टेम्पो तर लिंबाची 7 ते 8 हजार गोणी इतकी आवक झाली.

फळांचे दर पुढीलप्रमाणे :
डाळिंब : (प्रतिकिलोस) भगवा : 20-80, गणेश 10-40, आरक्ता 10-50, कलिंगड 10-20, खरबुज 10-30, पपई 5-20, चिक्कू 100-500, पेरू (20 किलो) : 700-900, लिंबे (गोणीस) 50-100, अननस (डझन) 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-240, (4 डझन) : 30-100, संत्रा (3 डझन) 150-300, (4 डझन) : 60-150, आंबा लंगडा 6 ते 7 किलो 900-1100, चौसा 6 ते 7 किलो 800-1100, प्लम (5 कि.) : 500-700, पिअर (10 ते 11 कि.) : 1000-1100.

फ्रेंडशीप डे मुळे पिवळ्या गुलाबाची मागणी वाढली
फ्रेंडशीप डे मुळे बाजारात पिवळ्या गुलाबाला मोठी मागणी आहे. सध्या बाजारात गुलाबाच्या प्रति गड्डीला 80 ते 100 रुपये दर मिळत असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विविध भागातून गुलाबाची चांगली आवक वाढली आहे. मात्र, पिवळ्या गुलाबाच्या तुलनेत इतर गुलाबांना मागणी कमी असल्याचेही व्यापार्‍यांनी सांगीतले. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चांगल्या दर्जाची फुले बाजारात येत असून त्यांना मागणीही चांगली आहे. श्रावणी सोमवार तसेच फ्रेंडशीप डे मुळे फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.

फुलांचे दर (प्रतिकिलोचे भाव) पुढीलप्रमाणे : झेंडू 30-60, गुलछडी 100-150, बिजली 120-160, कापरी 40-60, ऑस्टर : 20-30, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी 15-25, गुलछडी काडी : 10 ते 20, डच गुलाब (20 नग) 40-60, लिलिबंडल 3-6, अबोली लड : 200-300, जर्बेरा 10-30, कार्नेशियन 50-100, शेवंती : 100-160, जुई: 400़

मासळीच्या मागणीत घट
गणेश पेठेतील घाऊक बाजारात रविवारी खोल समुद्रातील 5 टन, खाडीची 100 किलो आणि नदीतील मासळीची 200 किलो इतकी आवक झाली. तर आंध्रप्रदेशातील रहु, कतला, सीलन या मासळींची सुमारे 4 टन आवक झाली. श्रावण महिन्यामुळे विविध मासळींच्या आवकबरोबरच मागणीत घट झाली आहे.

भाव (प्रतिकिलो)
करंदी ( सोललेली ) : 280, भिंग : 320, पाला: 1000-1400, वाम : 600, ओले बोंबील : 100-160 कापरी : 1200-1400, मोठे : 800-1000, मध्यम : 650-750, लहान : 550-650, भिला : 400, हलवा : 440-520, सुरमई : 440-480, रावस लहान : 600, मोठा : 700, घोळ : 650, करली : 280. कोळंबी : लहान : 240, मोठी : 360, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 650, लॉबस्टर : 1400, मोरी : 200-280, मांदेली : 100, राणीमासा : 180, खेकडे : 160-200, चिंबोर्‍या : 440.

खाडीची मासळी
सौंदाळे : 220, खापी : 220, नगली : लहान 240, मोठी 500, तांबोशी : 440, पालू : 200, लेपा : 160, शेवटे : 200, बांगडा : 100-140, पेडवी : 60, बेळुंजी : 80-100, तिसर्‍या : 160, खुबे : 140, तारली 120.

नदीची मासळी
रहू : 140, कतला : 140, मरळ : 320, शिवडा : 160, चिलापी : 60, मांगूर : 120, खवली : 160, आम्ळी : 80, खेकडे : 200, वाम : 400.
मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे : 440, खिमा : 440, कलेजी : 480.
चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 230.
अंडी : गावरान शेकडा : 550, डझन : 72, प्रति नग : 6, इंग्लिश शेकडा : 342, डझन : 48, प्रतिनग : 4