बँकातर्फे शिष्यवृत्तीधारकांचे शून्य बॅलन्स खाते उघडण्यास नकार

0

निजामपूर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील 15 जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शासकीय शिष्यवृत्तींसाठी शुन्य रकमेवर खाते न उघडल्याबाबतभारतीय स्टेट बँक, निजामपुर, सेंट्रल बँक जैतांणे यांना निवेदनाद्वारे खुलासा मागितला आहे. सर्व 15 जिप शाळेच्या मुख्यध्यापकांनी वारंवार बेँकेत जावून विद्यार्थ्यांचे शुन्य बॅलेन्सवर खाते उघड्याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र बॅकेच्या शाखेतून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. शासनाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती मुलांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यात इयत्ता 1ली ते 8वीच्या मुलांचे गणवेश व इतर रकमा जमा करवयाचे त्या रकमा खात्यात जमा करू शकलेले नाहीत.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
यामुळे शाखाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे शुन्य रकमेवर खाते का उघडले जात नाही याचा खुलासा करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा खुलासा मुख्याध्यापक आपल्या वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव, शिक्षक परिषेचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रे, मुखाध्यापाक कल्पना सावंत, मिलींद वाघ, राजेंद्र देसले, अशोक जाधव, दिलीप काकुळते, मंदाकिनी परदेशी, भोयेसर, विलास सोनवणे, मोहीते सरला, चनने मॅडम, प्रमोद खैरनार, सावता बोरसे, श्री चीते आदी शिक्षक निवेदन देताना उपस्थितीत होते.