बँक कर्मचार्‍यांच्या संपामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली । विविध मागण्यांच्या अनुषंगाने बँक कर्मचा-यांनी 28 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकेच्या व खातेधारकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचा-यांच्या संघटनांनी हा इशारा दिला आहे.

स्टेट बँक, पंजाब व नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदासह बहुतांश बँकांनी या संपात सहभागी होण्याचा इशारा दिला असून बँकांच्या शाखा व कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, क्सिस बँक आदी खाजगी क्षेत्रातील बँकांचे कामकाज सामान्य सुरू रहाणार आहे. केवळ धनादेश वठवण्याच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचार्‍यांच्या प्रमुख संघटनांची युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही मुख्य संघटना आहे.

भारतीय मजदूर संघाफशी संलग्न नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटना संपात सहभागी होणार नाहीत. 21 फेब्रुवारी रोजी मुख्य कामगार आयुक्तांसमोर एक बैठक झाली. मात्र ती निष्फळ ठरली.