बँक खाते हॅक करुन 90 हजाराची रेल्वेची तिकीटे बुक

0

पिंपरी-चिंचवड : कासारवाडी येथील एका इसमाचे बँक ऑफ इंडियाचे खाते हॅक करुन अज्ञाताने तब्ब्ल 90 हजाराची रेल्वेची तिकीटे बुक केली आहेत. ही ऑनलाईन चोरी केवळ सात दिवसात झाली असल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात केली आहे. भरत कुशावह (वय 51 रा. केशवनगर,कासारवाडी) यांनी ही तक्रार दिली आहे.

त्यांच्या खात्यातून एका अज्ञाताने 9 ते 16 नोव्हेंबर 2016 या सात दिवसाच्या कालावधीत आय.आर.सी.टी.सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणची तिकीटे बुक केली आहेत. मात्र ही बाब फिर्यादीच्या उशीरा लक्षात आल्याने त्यांनी आता तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाता विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.