जळगाव। लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्याच्या धोरणास अनुसरुन बँक खात्यांचे आधार क्रमांकाशी संलग्निकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांन बँक समन्वय समितीच्या बैठकीत दिले. जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जि.प. सीईओ आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक एस. व्ही.दामले, डीडीआर विशाल जाधवर, नाबार्ड बँकेचे सोमवंशी, सामाजिक उत्थानचे एस.एस. इखारे, एसबीआयचे सुनिल सराते आदी उपस्थित होते.
वनश्री पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले
वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तर तसेच महसुल विभाग स्तरावर ‘व्यक्ती’ ‘ग्रामपंचायत शैक्षणिक संस्था’ सेवाभावी संस्था व ‘ग्राम, विभाग, जिल्हा’ या 5 संवर्गात सामाजिक वनीकरण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरुप महसूल विभागस्तर- वरील प्रत्येक संवर्गामध्ये 2 पुरस्कार प्रथम रुपये 50 हजार व द्वितीय रुपये 30 हजार, राज्यस्तर- वरील प्रत्येक संवर्गामध्ये 3 पुरस्कार, प्रथम रुपेय 1 लाख व द्वितीय रु 75 हजार व तृतीय रु. 50 हजार किमान योग्यता- कमीत मी 3 वर्ष वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेले कार्य. इच्छुकांनी आपल्या जिल्ह्याचे उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांच्याशी संपर्क साधावा व 31 डिसेंबर 2016 अखेरच्या कार्याच्या आधारे ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2016’ साठीचे प्रस्ताव विहित प्रपत्रात 30 एप्रिल 2017 पर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे..
विविध कामांचा घेतला आढावा
यावेळी जिल्ह्यात आधार सीडींग अर्थात आधार क्रमांकाचे बँक खात्याशी संलग्नीकरण काम येत्या कालावधीत युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक बँकनिहाय आधार क्रमांक संलग्निकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी पिक कर्ज वितरणाचाही आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील विविध बँकांतून रब्बी हंगामासाठी 92 टक्के (193 कोटी 70 लाख रुपये) पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर खरीप हंगामासाठी 84 टक्के (2239 कोटी 18 लाख रुपये) पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बँक खाते सुरु केलेल्या नागरिकांना रुपे कार्ड वापराबाबत महिती दिली.