बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्या

0

चाळीसगाव । बंजारा समाजाची लोकसंख्या जिल्ह्यात मोठी आहे. बंजारा समाज हा भटका समाज म्हणून ओळखला जातो मात्र हा समाज आता स्थिर झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील बंजार्‍यांच्या तांड्याना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा तसेच मुलभुत सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी बंजारा समाज सेवा संघातर्फे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वातंत्र प्राप्तीनंतर अद्यापही मुलभुत सोयी सुविधांपासून वंचीत आहे. बहूतांश तांड्याना ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलेले असुन दुय्यम दर्जा दिला जात असल्यामुळे तसेच शिक्षणाचा अभाव व अशिक्षीतपणा या समाजात असल्यामुळे जुन्या रुढी परंपरा चालीरीती सुरु असल्याने या समाजाची आर्थिक,शैक्षणिक परिस्थिती नाजुक आहे.

1 जुलैला शासकीय सुटी द्या
राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे बंजारा समाजाचे प्रेरणास्थान आहे. राज्यात हरित क्रांतीसाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 1 जुलै हा त्यांचा जन्मदिन संपुर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जयंतीदिनी शासकीय सुटी जाहीर करण्यात यावी अशी मागणी बंजारा समाजबांधवांनी केली आहे.
समाज बांधवांचे पाल्य शैक्षणिक विकासासाठी शैक्षणिक सवलत देण्यात यावी अशी मागणी होत आहे. निवेदन देतांना अध्यक्ष ओंकार जाधव, सोमनाथ माळी, भिमराव जाधव, न्यानेश्वर राठोड, पुंडलिक राठोड, अँड.वाडीलाल चव्हाण, अशोक चव्हाण, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.