चाळीसगाव: आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते कृष्णापुरी तांडा – लोंढे येथील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांच्या 10 वी व 12 वी परीक्षांमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला व सोबतच कृष्णापुरी येथील धरण 100 टक्के भरल्याने त्याचे जलपूजन देखील आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, सरचिटणीस अमोल चव्हाण, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, कैलास पाटील, सुनील जिभाऊ, भोला पाटील, भोसले सर, मुख्याध्यापक सोनवणे, निकम, रुपेश जाधव, भाईदास, नितीन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. बंजारा समाजातील बहुतांश कुटुंब ही परजिल्ह्यात व परराज्यात ऊसतोडणी साठी जात असल्याने बर्याच मुला- मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटते. मात्र आता उशिरा का होईना समाजातील तरुण वर्गाने केलेल्या जनजागृती मुळे ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. विशेषतः बंजारा समाजातील तरुणींनी शिक्षणात पुढे येणे गरजेचे असून पुढील काळात तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत असेन असा विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.