मुंबई । आयपीएलच्या 10 व्या सीजनला सुरवात होणार आहे.मात्र या सीजनमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेल हा अष्टपलू खेळांडू दिसणार नाही आहे. या टूर्नामेटमध्ये रसेल हा कोलकाता नाईटरायडर्स संघाकडून खेळतो.मात्र डोपिंग चाचणीत अपात्र झाल्यामुळे मगील महिन्यात रसेलवर एक वर्षाची बंदी घातली आहे. डोपिंग चाचणीत अपात्र झाल्यामुळे रसेलवर एक वर्षाची बंदी घातली आहे. जी बंदी लावण्यात आली आहे ती बंदी 30 जानेवारी 2018 पर्यंत असणार आहे.
आयपीएलसह कुठेच सहभागी हो
ज्यानंतर हा कॅरेबियन क्रिकेटर यावर्षी आयपीएलसह इतर कोणत्याही टूर्नामेंटमध्ये भाग घेऊ शकणार नाही.त्यामुळे आयपीएलच्या व्यस्त शेडूल मधून त्याला वेळ मिळाला असल्यामुळे त्याने हा बंदी वेळ आपल्या परिवार व मित्रासोबत घालविण्यास सुरवात केली आहे. याशिवाय तो क्रिकेट यासोबतच आपला स्वत:चा हॉटेलचा बिजनेस सुरु करणार आहे. रसेल्स टी-20 रेस्त्रां स्पोर्ट्स बार’ नावाचे त्याचे हॉटेल ओल्ड हार्बरमध्ये खोलणार आहे. रसेल्स टी-20 रेस्त्रां स्पोर्ट्स बार या हॉटेलच्या उभारणीची तयारी पूर्ण झाली आहे.आंद्रे रसेल खपूच रंगेल स्वभावाचा व्यक्ती आहे. तसेच कॅरेबियन क्रिकेटर्स प्रमाणेच मौज मस्तीचे जीवन जगणे पसंत करतो. केकेआर टीमचा ऑलराउंडर रसेलने आयपीएल मध्ये 5 सीजन खेळला आहे. ज्यात त्याने 34 मॅच खेळून 574 धावा केल्या आहेत तसेच 31 विकेट घेतल्या आहेत.