दिवसातुन तीन वेळा प्रत्यक्ष जाणार कर्मचारी नियुक्त ठिकाणी
जळगाव – कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदीचे आदेश आहेत या पार्शभूमीवर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात आहेत बंदोबस्तावरील या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करत शहरात जिल्हा पोलिस दलाची सेनेटराईज व्हॅन सुरु करण्यात आली आहे. सेनेटराईज व्हॅन ही दिवसातुन तीन वेळा शहरात प्रत्यक्ष बंदोबस्ताच्या ठिकाणी जावुन पोलीस कर्मचार्यांना निर्जंतुक करणार आहे.
भारतात पसरत असलेल्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्या करीता जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग होवु नये म्हणुन
सदर बंदोबस्तावर नियुक्त पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टी कोनातुन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलाकडुन त्यांचे निरजंतुकीकरणा करीता सॅनेटायझर व्हॅन सुरु करण्यात आलेली अाहे.
सर्वसामान्यांसाठी ठरणार उपयोगी
सर्वसामान्य जनतेकरीता देखील व्हॅन उपयोगात येणार असुन कोरोनाच वाढणारा प्रादुर्भाव नियंत्रणाकरीता व्हॅनचा उपयोग करण्यात येणार आहे.