नवापूर। कोरोनामुळे अंमलात येत असलेल्या लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य,गोरगरीब जनतेस सोसावा लागत असुन त्यांच्यासाठी मदतीचा ओघही वाढत आहे. नवापुर पोलीसांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन शहरालगत असलेल्या एमआयडीसी येथे ५६ कामगारांना चार दिवस पुरेल इतके अन्न धान्य व इतर आवश्यक सामुग्रीचे वाटप केले.
संपुर्ण जगात कोरोना विषाणुचा कहर सुरु असल्याने देशात २१ दिवसांचा लाॅकडाऊन पाळला जात आहे. परिणामी रोज कमावुन रोज खाणारे परिवार कमालीचे बाधीत झाले आहे. या काळात गरीबांचे मोठे हाल होत आहे. हे सर्व चिञ पाहता अशा कामगारांना सामाजिक स्तरावर मदतीचा ओघ सुरु झाला आहे. राजकिय, अध्यात्मिक व सामाजिक संघटना याकामी सरसावल्या आहेत. नवापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील याकामी मागे राहिलेले नाहीत. पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, अॅड. अनिल शर्मा, ईश्वर पाटील व सर्व पोलीस कर्मचारी बाधवांनी जीवनावश्यक वस्तुंची किट तयार करुन चार दिवस पुरेल असे रोजंदारीवर काम करणारे एमआयडीसी येथील कामगार व गरजुना वाटप केले. यावेळी पोलीस कर्मचारी प्रविण मोरे, कृष्णा पवार, आदिनाथ गोसावी, निजाम पाडवी,प्रशांत यादव, भिमराव बहिरम, जगदीश सोनवणे,दिनेश बाविस्कर, प्रमोद पाटील, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.