बंद घर चोरट्यांना पर्वणी : 80 हजारांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

Burglary Again in Bhusawal : 80 Thousand Stolen भुसावळ : जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास कागदावर असतानाच शहरातील साकरी फाट्या जवळील हनुमान नगरात घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज लांबल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात चोर्‍या-घरफोड्या वाढल्या
तक्रारदार सुशीलाबाई किरण कुमार जैन यांच्या घरातून चोरट्यांनी गुरूवारी रात्री आठ हजार रुपये किंमतीचा पाण्याचा पंप, 44 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, सहा हजार रुपये रोख असा एकूण 58 हजारांचा ऐवज लांबवला. चोरीची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सुशीलाबाई किरणकुमार जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार शरीफोद्दीन काझी करीत आहेत.