बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी : जळगावातून सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीला

Locked house broken in Radhyeshyam Colony : compensation of 152 lakhs extended जळगाव : जळगाव शहरातील मोहाडी रोड परीसरातील राधेश्याम कॉलनीत बंदघर फोडून सुमारे दोन लाख 27 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्यात आली. हा प्रकार बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
हर्षा गोविंदा भागवानी (27, रा.राधेश्याम कॉलनी, हटकर मंदिराच्या पाठीमागे, मोहाडी रोड, जळगाव) या महिला पती, सासू व सासरे यांच्यासह वास्तव्याला आहेत. 6 ऑक्टोबर रोजी हर्षा भागवानी हे त्यांचे पतीसह मुंबईला तीन दिवसांसाठी कामानिमित्त गेल्या असता घर बंद असल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. 14 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

अज्ञात चोरट्यांचा शोध
दरम्यान हर्ष भागवानी ह्या मुंबईहून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सामान व लोखंडी कपाटातील वस्तू सर्व अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. या संदर्भात त्यांनी दुपारी 12 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.