पारोळा : शहरातील गंगूबाई नगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने मिळून एक लाख 2 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांनी साधली संधी
ललित राजेसिंग राजपूत (40, गंगुबाई नगर, पारोळा) हे म्हसवे येथील आयडीबीआय बँकेत नोकरीला आहे. सोमवार, 2 मे सकाळी 11 ते घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. घराचा घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील 70 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.