बंधारपाडा ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण मोहीम

0

नवापूर। बंधारपाडा ता.नवापुर येथे ग्रामपंचायततर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नवापुर पंचायत समितीच्या सभापती सविता गावित, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर तसेच केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटनेचे राय उपसचिव अँड जयेश चांदेकर,सल्लागार अँड ऋतुल कुलकर्णी उपस्थित होते.वृक्षरोपन का करावे व ते किती महत्वाचे व कोण-कोणते झाडे लावावीत याबद्दल नंदकुमार वाळेकर यांनी जनतेला समजावून सांगितले. तसेच सभापती सविता गावीत यांनी सर्व जनतेला झाडे लावण्यासाठी आवाहन केले.

यांचा होता सहभाग
या कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष शरद नेरे यांनी केली तर आभार सरपंच अनिल गावित यांनी मांडले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वाचे कार्य नंदुरबार महिला सचिव रागिनी सूर्यवंशी, विसरवाडी परिसरातील संघटनेचे कार्यकर्ते पिकेश अग्रवाल, कटारीया, अग्रवाल नवापुर तालुका अध्यक्ष प्रविण गावीत, उमेश पाटिल, सागर गावित, पंकज पाटिल यांनी परिश्रम घेतले.