दिलासा ; खडका रोड भागात येणार प्रथम पाणी
भुसावळ : आवर्तनास विलंब झाल्याने शहरवासीयांना तब्बल सहा दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागता होता. पाटबंधारे विभागाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आवर्तन सोडण्यात आले तर शनिवारी सायंकाळी बंधार्यात पाणी पोहोचले तर रविवारपासून शहराचा खंडीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. रविवारी खडका रोड भागातून पाणीपुरवठ्यास सुरूवात होईल तर सोमवारी वांजोळा रोड, गंगाराम प्लॉट बायपास तर मंगळवारी हनुमान नगर, नाहाटा कॉलेजमागील भाग तसेच बुधवारी चमेलीनगर, नवीन लाईन, चक्रधर नगर भागात पाणीपुरवठा होईल.
रेल्वे लाईन भागात असे आहे रोटेशन
रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील भागात रविवारी वसंत टॉकीज, तापी नगर तर सोमवारी गजानन महाराज नगर, ढाके गल्ली व मंगळवारी जळगाव रोडचा खालचा भाग तसेच बुधवारी जळगाव रोड भागात पाणीपुरवठा होईल. नागरीकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी केली आहे.