बक्षिसांमुळे अभ्यास करण्याची मिळते ऊर्जा

0

शिरपूर । विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात,विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवतात अशा विद्यार्थ्याना बक्षिस दिल्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते वअधिक मेहनत घेऊन यश मिळवतात म्हणून असे कार्यक्रम कौतुकास्पद असतात. बोराडी सारख्या आदिवासी भागातील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे काम अतिशय कौतुक करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे यांनी केले.

विजेत्यांना बक्षिस वितरण
बोराडी येथील कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये वार्षिक बक्षिस वितरण समारंभ व फॅन्सी ड्रेस स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्‍वस्त आर.एफ.पाडवी,शिरपूर पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी आर.के.गायकवाड,साहेबराव पाटील,शिवाजीराव पाटील,शाळेचे समन्वयक जी.ओ.पाटील,मगन पवार,रामकृष्ण पवार,पांडुरंग पावरा,विष्णू पाटील, टि.के.कुवर,गणेश भामरे,गोकुळ पाटील,चंद्रकांत बडगुजर उपस्थित होते. यावेळी बेस्ट स्टुडंट बक्षिस मयुरेश गणेश भामरे, कनिष्का पावरा यांना देण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थी व प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,भेटवस्तू,शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यशस्वीतेसाठी प्राचार्या पल्लवी पवार,सविता वाल्हे,मनीषा पवार,मोहिनी भामरे,प्रकाश पावरा,संजय पावरा,देवेंद्र बडगुजर,प्रकाश वाल्हे,हर्षल पाटील,सुनंदा पावरा,गौरव चौधरी,प्रिती बागडे,कांचन निंबाळकर,विजय धनगर,कविता कुलकर्णी,रोहिणी सैंदाणे,पल्लवी पाटील,मिना चौरे,एन.टी.मिस्तरी यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन पंकज कोळी,संभाजी पावरा यांनी केले, तर जी.ओ.पाटील यांनी आभार मानले.