आकुर्डी : बजाज ऑटो एप्लॉईज को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये समर्थ सहकार पॅनलचा पराभव करत विश्वू कल्याण कामगार संघटना पुरस्कृत कै.रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनलचे 9 उमेदवार बहुमताने निवडून आले.
हे देखील वाचा
पतसंस्थेच्या 11 जागांसाठी मतदान घेण्यात आले. 92.71 टक्के म्हणजेच 1451 सभासदांनी मतदान केले. पूर्वीचे परिवर्तन पॅनल म्हणजेच आत्ताचे समर्थ सहकार पॅनल कै. रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनेलच्या विरोधात उभे ठाकले होते. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व माजी नगरसेवक ईश्वरर ठोंबरे तर रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनलचे नेतृत्व कामगार नेते दिलीप पवार, सरचिटणीस बाळासाहेब थोरवे, उपाध्यक्ष प्रदीपकुमार खाडे यांनी केले. निवडणुकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या. रावसाहेब पोपटराव शिंदे पॅनलचे अंकुश कोल्हापुरे, जालिंदर खतकर, राधाकृष्ण माने, सुनील मिसाळ, सर्जेराव पाटील, पंकज पाटील, जयवंत कांबळे, संजय बेदरकर, तुषार टपले हे उमेदवार विजयी झाले.