बज्मे फरोगे उर्दू अदबच्या पदाधिकार्‍यांना अटक करा

0

भुसावळात पत्रकार परीषदेत डॉ. एजाज खान

भुसावळ : सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पूर्वीच नोंदणी असलेल्या बज्मे फरोगे उर्दू अदब पाळधी नावाने बनावट कागदपत्रे व स्वाक्षर्‍या करून नगरपरिषदेच्या मालकीचे भूखंड लाटणार्‍या संस्थेच्या तथाकथित पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी डॉ. एजाज अहमद खान यांनी केली. रविवार, 3 जून रोजी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परीषद घेतली. सोबत डॉ. सिराज महेमूद हुसेन, इकबाल अहमद, चिरागोद्दीन काझी उपस्थित होते.

नगरपरीषदेसह संचालकांची फसवणूक
डॉ.एजाज खान पुढे म्हणाले की, माझी बहीण शहेनाज परवीन अहमद खान हिचा विवाह सन 1997 मध्ये पाळधी, ता.एरंडोल येथील मोहम्मद इस्माईल शेख इस्माईल यांच्याशी झाले होते. पेशाने शिक्षक असलेल्या मो. इस्माईल यांनी भुसावळ येथे येऊन आपण शिक्षण संस्थेची स्थापना करुन असा प्रस्ताव ठेवला. बज्मे फरोगे उर्दू अदब ही संस्था सुरू करू, असे सांगून दस्ताऐवज तयार केले. त्यात स्वत: अध्यक्ष, उपाध्यक्ष शेख शाकीर, सचिव मो. शकील, सहसचिव डॉ. सिराज हुसेन, कोषाध्यक्ष शेख इकबाल, सदस्य डॉ. एजाज खान, सैय्यद अतिक शहनाज परवीन, इक्बाल खान, शमीम खान व फराह नाज यांची नावे व सह्या घेऊन संस्था नोंदणी झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी शाळेसाठी जागेची मागणी केली. डॉ. सिराज यांनी त्यांचे आईच्या नावावर असलेले सव्र्हे क्रं. 11/2 मधील प्लॉट क्रं. 1 ही मिळकत दिल्याने त्यात रजा हुसेन शाळा सुरु करण्यात आली. यानंतर 2005 मध्ये शेख इस्माईल यांनी प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी भुसावळ नगरपरिषद मालकीचे खुले भूखंड 53/1/2+2/2 हे मिळवले होते. शाळेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने विचारणा करुन कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी अनेकवेळा धमक्या दिल्या व या वादातून पत्नीला फारकत दिली. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून माहिती घेतली असता संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्यांच्या घरचेच होते. बनावट कागदपत्रे बनवून आमची व नगरपरीषदेची फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कुठल्याही फेरफारला स्थगिती मिळाली आहे. संस्थेत सध्या 10 जागांना शासनाचे अनुदान असून 10 जागांना अद्याप अनुदान नाही. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या भरतीत त्यांनी मोठा अपहार केला असून ’हर्षद मेहता’ सारख्या या अध्यक्षाशी कुणीही आर्थिक व्यवहार करु नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.