धुळे । जे.बी.बडगुजर कॉलनीत मोबाईल टॉवर उभारणीचा घाट घातला जात असून हा टॉवर नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टिने अपायकारक असल्याने त्याची उभारणी तत्काळ थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मनपा उपायुक्त रविंद्र जाधव यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. देवपूरातील सर्व्हे नं.42/1, प्लॉट नं.40,जे.बी.बडगुजर कॉलनी येथे मोबाईल टॉवरची उभारणी केली जात आहे. त्यादृष्टिने रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे.
हा मोबाईल टॉवर स्थानिक रहिवाशांच्या दृष्टिने आरोग्यावर परिणाम करणारा आहे. यामुळे भविष्यात आरोग्याचा धोका उद्भवु शकतो. या टॉवरला स्थानिक नागरिकांचा विरोध असून याची दखल घेवून हे काम तत्काळ थांबवावे, अशी मागणी जे.बी.बडगुजर कॉलनी,सर्व्हे नं.42/1 जीटीपी स्टॉप जवळील रहिवासी न्हानु भदाणे, झेंडु महाजन, आर.एल.जोशी,अनिल नागमोते, जगदीश खोडके, विजय नागमोते, डॉ.महेंद्र पाटील, दंगल वाघ, पद्माकर दलाल, रविंद्र अहिरराव, डॉ.संभाजी पाटील, योगेश सोनजे, दीपक सोनजे, एन.जी.पाटील, एम.जे.बडगुजर, जी.टी.शिंपी आदींनी केली आहे.