वरखेडी : येथील पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त आंतर महाविद्यालयीन चित्रकला रंग महोत्सव स्पर्धा व रांगोळी स्पर्धा विद्यालयात पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविशंकर पांडे, जि.प.सदस्य संतोष चौधरी, माजी सभापती इस्माईल फकिरा, माजी सरपंच दादासाहेब पाटील, डॉ.अल्ताफ कहकार, निर्मल पेट्रोलपंप संचालक स्नेहदिप गरुड. पो.पा. बाळु कुमावत, प्रभाकर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
विजेत्यांना दिले बक्षिसे
यावेळी कै. आचार्य गजाननराव गरुड, हरिप्रसाद महाजन, कै.भास्करराव गरुड व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक ए.के.पाटील, पर्यवेक्षक एच.पी.चव्हाण व शिक्षकवंद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कै.आचार्य बापू यांच्या स्मृतीप्रत्यार्थ परिसरातील जि.प.मराठी शाळेत चित्रकला परीक्षेचे आयोजन करुन त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिस देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिस देण्यात आले व ट्रॉफी देण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना ए.के.पाटील यांनी केली. यावेळी 5 वी ते 10वीच्या मुलामुलींनी व संतोष चौधरी, इस्माईल शेठ, संतोष पाटील, रविशंकर पांडे यांनी कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या जीवनावरती भाषण दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण व शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.