बड्या उद्योजकाच्या मुलाला लुटले

0

जळगाव । शहरातील एका बड्या उद्योजकाचा मुलगा व्यवहाराचे पैसे घेऊन जळगावात कारने येत होता. मात्र, इंडिकातून आलेल्या दोघांनी त्याची कार रस्त्यातच उडवून दमदाटी करून त्याच्याजवळ असलेली चार ते साडेचार लाख रुपयांची रक्कम लुटून नेली. ही घटना शनिवारी सायंकाळी खेडीगावाजवळ घडली. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही भामट्यांनी कारच्या काचा फोडून नुकसान केले आहे.

कारच्या काचा फोडल्या
उद्योजक सुनिल मंत्री यांचा मुलगा यश शनिवारी सायंकाळी व्यवहाराचे पैसे घेवून जळगाव शहरात कारने परतत होता. त्यावेळी त्याच्यासोबत ड्रायव्हर देखील सोबत होता. सायंकाळी खेळीगावाजवळ आल्यानंतर त्यांच्या मागून भरधाव वेगात इंडिका कार आली आणि कारच्या समोरच इंडिका आडवी उभी करून त्यांनी यश याची कार उडवली. त्यानंतर इंडिकातून अशोक नामदेव सोनवणे उर्फ कन्हैय्या व शंकर ठाकरे नाकम दोन व्यक्ती उतरले आणि त्यांनी यशला जीवे मारण्याची धमकी देत कारची तोडफोड केली.

साडेचार लाख रुपये लुटले
त्यानंतर त्यांनी दमदाटी करून त्यांच्याजवळ असलेली चार ते साडेचार लाख रूपये असलेली बॅग जबरदस्तीने ओढून चोरून नेली. दरम्यान, यशने लागलीच घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक रत्नपारखी व सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेत. त्यानंतर घटनेची माहिती घेत परिसराची पाहणी केली. त्यानंतर यशने घडलेली हकिकत सांगितले व त्या दोन्ही व्यक्तींची नावे देखील सांगितली. यानंतर रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.