भुसावळ : बदनामी का करतो? असा जाब विचारण्याचा राग आल्याने एकाने तरुणाच्या घरात जावून त्यास अश्लील शब्दात शिविगाळ करून मारहाण केली तसेच दुचाकीची तोडफोड केल्याने एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवार, 19 रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना शहरातील श्रीराम नगर, तुळशी नगर भागात घडली. या प्रकरणी सुरेखा जितेंद्र ठाकूर (रा.श्रीराम नगर, तुळशी नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी भावेश काशीनाथ राठोड (रा.श्रीराम नगर, तुळशी नगर, भुसावळ) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांचा मुलगा तुषार हा लोखंडी चॅनल गेटची चोरी करतो, अशी बदनामी करण्यात आल्याने तुषार याने संशयीत भावेशला जाब विचारला होता. त्याचा राग आल्याने संशयीत भावेश राठोड याने रविवारी सायंकाळी घरी येत तुषार ठाकूर यास अश्लील शब्दात शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली तसेच इलेक्ट्रीक दुचाकीचे नुकसान केले. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार करीत आहेत.