जळगाव । शेगावहून चारचाकी वाहनाने जळगावातील एमआयडीसीतील परीसरात वाहन लावून महिला आणि पुरूष यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सदरील महिला ही कानळदा येथील माहेर असून तीची 27 जुलै रोजी तालुका पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मयुरी प्रशांत इं
गळे आणि गजानन विश्वनाथ पंडीतकर अशी मयतांची नावे आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव औद्योगिक वसाहतीतील लोकमत कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर (एमएच 20 बीएन 7660) क्रमांकाच्या गाडीत मयुरी आणि गजानन मयत स्थितीत असतांना जाणार्या येणार्यांच्या लक्षात आले. हाकेच्या अंतरावर असलेल्या एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. पंचनामा करून दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी प्रदिप पवार यांनी दोघांना विषारी औषध घेवून मयत झाल्याचे घोषीत केले. सोबत 13 वर्षांचा तन्मय देखील होता. तन्मयच्या मदतीने पोलीसांनी तन्मयचे मामा ज्ञानेश्वर दिलीपराव देशमुख यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती मिळाली.
शेगावहून रात्री 10 वाजता निघाले जळगावकडे
तन्मयच्या माहितीनुसार, रात्री 10 वाजेच्या सुमारास मयुरी इंगळे, मुलगा तन्मय इंगळे आणि गजानन पंडीतकर हे सुझुकी अल्टो कार क्रमांक (एमएच 20 बीएन 7660) ने शेगावहून जळगावकडे येण्यासाठी रवाना झाले होते. रात्री तन्मय झोपून गेला होता. सळाळी तन्मयला जाग आल्यावर आई मयुरीने सांगितले की, आईकडे
लक्ष दे, स्वतःची काळजी घे, दीदीकडे लक्ष दे, आता मी झोपते, असे सांगून बाटलीत विषारी औषध घेवून आत्महत्या केली. दुसरीकडे गजानन पंडीतकर यांनी त्यांचा मुलगा शुभम याला मोबाईलवर मॅसेज केला की, शुभम तू जळगावला ये, आपली गाडी व मलापण घेवून जा अजिंठा रोडवर ये, आईला काहीच सांगून नको असे न
मूद केले. दोघांनी आत्महत्या एकाच ठिकाणी सुझुका अल्टोमध्येच केली. त्यावेळी तन्मय हा गाडीतच बसलेला होता. यानंतर मयुरीला एक उलटी झाली. रस्त्याने जाणार्या येणार्यांना संशय आल्यावर मुलगा गाडीत का बसल्याचे विचारल्यानंतर आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सुसाईड नोट आढळली; दोघांवर केले आरोप
दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी मयुरीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, दादा तू मामाच्या नावाचा रिपोर्ट देवून फार मोठी चुक केली. त्याचा मामाचा काही एक संबध नव्हात. मी काल मामाला फोन लावल तेव्हा मला माहिती पडलं खरं कारण, या सगळ्या कारणाला जिम्मेदार रेखा व मह्या आहे. या दोघांनी माझी इज्जत रस्त्यावर आणली म्हणून मी आत्महत्या करत आहे. त्यांना खुप मोठी सजा द्यायला पाहिजे. माझ्या व मामाचे आत्महत्याचे कारण महादेव समाधान चोपडे आणि रेखा पवन इंगळे हे दोघ आहेत. कारण त्यांनी आमची बदनामी पुर्ण कॉलनीत केली. ही गोष्ट फक्त मला माहित होती, म्हणून मी घर सोडून गेली होती. मामाच्या घरी पण माही पडले. दादा तुला जर वाटत असेल तर आपल्या बहिणीच्या आत्म्याला शांती लागावी तर या दोघांना अटक कर आणि शिक्षा द्यायला लाव. माझ्या मुलांचा संभाळ तुलाच करायचं आहे. तनू (मुलगी पुर्वा) माझ्याशिवाय राहु शकत नाही. त्यांना अंतर देऊ नको, शेवटपर्यंत माझी इज्जत गेली तर मी जगून काय करू.
पाच वर्षांपुर्वी मुयरीचे पतीचे निधन
मयुरी प्रशांत इंगळे (वय-32, रा. कानळदा ता.जि.जळगाव) ही विवाहित असतांना 2013 मध्ये पती प्रशांत इंगळे रा. घाटपूरा ता.खांबगाव जि.बुलढाणा यांचे निधन झाले होते. पतीने निधन झाल्यापासून मे 2018पर्यंत घाटपूरा (बुलढाणा) येथेच राहत होत्या. मयुरी इंगळे यांनी तन्मय आणि पुर्वा नावाचे दोन अपत्य आहेत. तन्मय हा आठवीला तर पुर्वा ही पाचवीत आहे. त्याच गावातील रहिवाशी गजानन विश्वनाथ पांडीतकर हा रहिवाशी आहे.