बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला हवे- सुब्रमण्यम

0

चालकांमध्ये केली जनजागृती

पिंपरी-  वाहनांच्या बाबतीत सध्या वेगवेगळ्या प्रकाराचे संशोधन सातत्याने होत आहे. वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्यातील तंत्रज्ञानात देखील नवनवे बदल होत आहेत. या बदलांशी वाहनचालकांनी जुळवून घ्यायला हवे, असे मत टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सुब्रमण्यम सुर्यनारायण यांनी व्यक्त केले. कासारवाडी आयडीटीआरमध्ये आयोजित चालक प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत चव्हाण, पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक विलास बांदल, टाटा मोटर्स सीएसआर हेड विनोद कुलकर्णी, टाटा मोटर्स इंजिनियरिंग रिसर्च हेड ज्योतिंद्रन कुट्टी, टाटा मोटर्सचे अमितकुमार गोयल, एसकेआयपीचे जोसेफ स्टॅन्ली, आयडीटीआरचे सचिव प्रशांत काकडे आदी उपस्थित होते.

टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी. लि., टाटा मोटर्स लि., स्कील फॉर प्रोग्रेस (एसकेआयपी) आणि इन्सिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च (आयडीटीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने चालक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील 5 ठिकाणी सुमारे 5 हजार चालकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यात चालकांमध्ये सुरक्षित वाहतूक, तणाव व्यवस्थापन, आरोग्य तपासणी, वैद्यकीय अपघात विमा आणि एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती केली जाणार आहे.

प्रशिक्षित करण्यासाठी उचचले पाऊल
सुब्रमण्यम सुर्यनारायण पुढे म्हणाले, रस्ते वाहतुकीत अपघाताचे प्रमाण अधिक असून जास्तीत जास्त कालावधी चालक या असुरक्षित रस्त्यावर घालवतो. अपघात हा सगळ्यांसोबत होत असतो. परंतु, अपघातानंतर आपल्या कुटुंबाची होणारी अर्थिक असुविधा होणार नाही. या करिता अपघात विमा, आरोग्य विमा चालकांसाठी एकप्रकारे सुरक्षाकवच आहे. टाटा एआयजी इन्शुरन्सच्या माध्यमातून चालकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. रस्ता सुरक्षेसाठी टाटा मोटर्सने सीएसआरच्या माध्यमातून राबविलेला उपक्रम म्हणजे चालकांशी मैत्री करून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर चालकांच्या अपघातांचे प्रमाण देखील पाहायला हवे. के. बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. तर, विद्याधर मेढेकर यांनी आभार मानले.