ठाणे – बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीला आज शुक्रवारी भीषण आग लागली आहे. घटना समोर आली आहे. माणकीवली एमआयडीसीतील प्लॅटीनम पॉलिमर कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
माणकीवली एमआयडीसीत प्लॅटीनम पॉलिमर कंपनी आहे. शुक्रवारी सकाळी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.