बदली झालेल्यांचा निरोप समारंभ!

0

चाकण- येथील पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप आणि पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांची अनुक्रमे कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी बदली झाल्याने पोलीस ठाण्याकडून त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपअधीक्षक राम पठारे आणि पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी चाकण पोलीस स्टेशन चे कर्मचारी उपस्थित होते.