नंदुरबार । जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेने झोप उडाली असून या बदल्यांमध्ये अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे साकडे घातले आहे. दरवर्षी होणार्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोळ होत असतो. त्यामुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या वर्षी देखील तशीच परिस्थिती दिसून येत आहे. या वर्षी ऑनलाईन बदलीचे धोरण आहे. यापूर्वी ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात नोकरी केली आहे, अशा शिक्षकांना पुन्हा दुर्गम भागात जावे लागणार असल्याची भिती आहे. म्हणून न्याय मिळावा यासाठी प्राथमिक शिक्षकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी शिक्षक अधिकार्यांना निवेदन देवून विनंती करीत आहेत. परंतू अधिकार्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गुरूजींनी आपला मोर्चा लोकप्रतिनिधींकडे वळविला आहे. सोमवारी शेकडो शिक्षकांनी आ. चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेवून . अन्याय दुर करण्याची मागणी केली. या प्रश्नी आपण माहीती घेवून लक्ष घालण्याचे आश्वासन आ रघुवंशी यांनी दिले,