अश्विनी नाईकवाडी हिने पटकाविला प्रथम क्रमांक
निगडी : पर्यावरण संवर्धन समिती (इसिए) च्या वतीने सुहृद मंडळ पुणे संचालित चिंचवड बधिर-मुक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी निःशुल्क चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचा विषय स्वच्छ भारत होता. या स्पर्धेत 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. अश्विनी नाईकवाडी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशिस्ती पत्रक देवून सन्मानित करण्यात आले. स्वच्छ भारत अंतर्गत कचरा व्यवस्थापन आणि वर्गीकरणा बाबत विकास पाटील यांनी माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी स्पर्धा शाळेच्या आवारात सुरु झाली. स्पर्धेचे परीक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी अदिती हर्डीकर, नामवंत चित्रकार विश्वास फडणीस, अ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुर्गुडे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, विश्वास जपे, इंद्रजीत चव्हाण, दत्तात्रेय चितोडकर, अनिल दिवाकर, मिनाक्षी मेरुकर, रंजना कुदळे, सुनीता जुन्नरकर, गोविंद चितोडकर, अनघा दिवाकर, मनपा आरोग्य निरीक्षक बापू गायकवाड , शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटोळे आणि शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थांचे कौतुक करण्यास उपस्थित होते
विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
इसिए तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक अश्विनी नाईकवाडी, द्वितीय क्रमांक हाशीस पासवान, तृतीय क्रमांक खुशाली कुसाळे यांचा आला तर उत्तेजनार्थ बक्षिस श्रेयस उबाळे या विद्यार्थ्याला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रभाकर मेरुकर यांनी केले व आभार अरुण शिंदे यांनी मानले.