बोदवड- मलकापूर शहरात बोदवड रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपानजीक नकली नोटांची देवाण-घेवाण करताना शेख कलीम शेख जैनुद्दीन उर्फ कलीम अण्णा ( 40) व शेख अमीर सोहेल उर्फ राजू शेख रीसाल उद्दीन (25, दोघे रा.बोदवड) यांना बुलढाणा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या पथकाने पकडले होते. आरोपींना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती तर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळला आहे.
आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला
संशयीतांकडून कारवाईवेळी दोनशे व शंभर रुपयांच्या एकूण 39 हजार 600 रुपयांच्या नकली नोटा व एक दुचाकी तसेच दोन मोबाईल 50 हजार रुपये असा एकूण 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. आरोपींना सुरुवातीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती व नंतर त्यांची बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपींनी न्यायालयीन कोठडीदरम्यान जामिनासाठी अर्ज केल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी त्यावर सुनावणी होवून जिल्हा न्या.आर.एम.जाधव यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता विवेक बापट यांनी युक्तीवाद केला.