बनावट कागदपत्रांद्वारे शेती विकली : आरोपीला अटक

0

मुक्ताईनगर- बनावट कागदपत्रांद्वारे शेती विकल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी बाजीराव उर्फ संभाजी पाटील (37, चलचक्र, ता.मुक्ताईनगर) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुर्‍हेपानाचे गावातून अटक केली. आरोपीने निवृत्ती जगन्नाथ पाटील (60, तळवेल) यांना मानेगाव शिवारातील शेत विकून त्यांची फसवणूक केल्याने मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. आरोपीस मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.