बनावट दारू प्रकरण; 19 पर्यंत कोठडी

0

जळगाव। चोपड्याकडून एका दहा चाकी ट्रकमधून अवैधरित्या चंद्रपुर जिल्ह्यात नेण्यात येणारी 18 लाख 20 हजारांची बनावट दारू रविवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडून ट्रकचालकासह दोन जणांना अटक केली होती. त्यांना सोमवारी न्यायाधीश सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता 19 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चालक राजेंद्र सुरेश खारकर याच्यासह शितल सुकदेव ब्राम्हणे व धनराज उरकुडा चापले हे तिघे चोपड्याकडून ट्रक क्रमांक एमएच.40.एन.9621 ने दारूबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात देशी दारूचा साठा घेऊन जात असताना गुजराल पट्रोलपंपाजवळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने यांना पडकले होते. यावेळी ट्रकमधील मिठांच्या गोण्यांच्या मागे 18 लाख 20 हजार रूपयांची बनावट दारून मिळून आली होती. त्यानंतर ट्रकचालकासह दोघांना अटक करण्यात आली. सोमवारी तिघांना न्यायाधीश सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात कामकाज होवून तिघांना न्या.सिदनाळे यांनी 19 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सकरापक्षातर्फे विद्या राजपुत यांनी कामकाज पाहिले.