बनावट देशी दारू प्रकरणी आरोपीला कोठडी

0

यावल:- बनावट देशी दारू बनवल्याप्रकरणी अटकेतील आरोपी आकाश चोपडे यास न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फैजपूर रस्त्यावरील विस्तारीत भागात हरिओम नगरातील प्लॉट क्रमांक 28 मध्ये संशयीत आरोपी आकाश उर्फ निरज सतीष चोपडे (वय 28, रा. यावल) या तरूणाने पत्र्याचे शेड उभारून बनावट देशी दारूचा कारखाना थाटला होता.

या कारखान्यावर बुधवारी गुप्त माहितीच्या आधाराने पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी व राज्य उत्पादन शुल्क चे भुसावळचे निरीक्षक ए.बी.पवार यांनी छापा टाकला होता. त्यात स्पिरीट रसायनच्या 35 लीटरच्या सहा कॅन एकूण 210 लीटर स्पिरीट व देशी दारूच्या 15 क्वॉटर आणि सुमारे 15 डझन देशीदारूच्या रिकाम्या क्वॉटर असा एकूण 53 हजार 880 रूपयाचा मुद्देमाल या ठिकाणहून पथकाने जप्त केला होता. संशयीत आकाश उर्फ निरज सतीश चोपडे यास ताब्यात घेतले होते. तपास सहाय्यक फौजदार रा.का.पाटील यांनी गुरूवारी संशयित आकाश चोपडे यास येथील प्रथमवर्ग न्या.डी.जी.जगताप यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.