नागपूर – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, घरपोच प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम यांसारख्या सुविधा उपलब्ध असतानाही नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणार्या तहसील कार्यालयाच्या परिसरात बनावट प्रमाणपत्र काढले जात असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. दलालाने बनावट प्रमाणपत्र बनविण्यासाठी चक्क खोटी वंशावळच लिहून काढली. फसवणूक झालेल्याने तक्रार दाखल केल्याने सदर पोलिसांनी या दलालाविरोधात गुन्हा दाखल केला.