बनावट सही करुन शेती नावावर लावण्याप्रकरणी गुन्हा

0

चाळीसगाव । 18 वर्षांपासुन हरवलेल्या व्यक्तीची तलाठीने दिलेल्या हरकतवर खोटी सही करुन शेती नावावर करणा-यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी निलेश बापु माने (23) रा प्रताप चौक पाटील वाडा चाळीसगाव यांचे वडील बापु माने व त्यांचा भाऊ अशोक शंकर माने (रा. दक्षीणा सोसायटी बिल्डींग नं. सी-6 रुम नं. 2 सेक्टर 15 ऐरोली नवी मुंबई) यांची चाळीसगाव शिवारातील वडीलोपार्जीत शेत गट नं. 203/2 अ ही शेतजमीन आहे. शेती नावावर करताना कोणाची काही हरकत असेल तर अशा आशयाची हरकत नोटीस तलाठी मार्फत दिली जाते तशी हरकत आरोपी अशोक शंकर माने यांना तलाठीने दिल्यावर आरोपीने 2000 सालापासून हरवलेले बापु माने यांची इंग्रजीमध्ये सही असतांना बनावट दस्तऐवज तयार केले व त्यांची मराठीत सही करुन ती खरी असल्याचे भासवुन 22 मार्च 2017 रोजी शहरातील तलाठी व तहसील कार्यालयात दस्तऐवज वापरुन शेत मिळकत नावावर करुन घेतली. याबाबत निलेश माने यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता त्याची चौकशी करुन 7 मार्च 2018 रोजी निलेश बापु माने यांनी फिर्याद दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी अशोक शंकर माने याचे विरोधात गुरन 52/2018 भादवि कलम 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरिक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.