बनावट सॉल्व्हन्सी प्रकरणी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

0

यावल– तुरूंगातील आरोपींना सोडवण्याकरीता न्यायालयात खोेटे व बनावट ऐपतीचे दाखले (सॉल्व्हन्सी) सादर करणार्‍या प्रमुख संशयीत अविनाश समाधान वाकोडे व संतोष गंगाराम कोथळकर (रा.मोठी उमरी, जुन्या ग्रामपंचातीजवळ, अकोला ) या दोघांची सात दिवसाची पोलीस कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना पुन्हा यावल न्यायालयात न्या.डी.जी.जगताप यांच्या न्यायासनासमोर उभे केले असता दोघांना पुन्हा तीन दिवसाची (7 एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे करीत आहेत.